आर्त एकला पाऊस
वाट चुकला पाऊस
ओघळत्या चांदव्यात
चिम्ब भिजला पाऊस
वारा उधाण पाऊस
स्पर्श बेभान पाऊस
कवाडात कोसळता
भोळा अजाण पाऊस
मंद सुवास पाऊस
धुंद आभास पाऊस
साजणाच्या मिठीतला
स्वप्नप्रवास पाऊस
प्रेम साधना पाऊस
गोड वेदना पाऊस
डोळ्यातून झरणारी
चिम्ब भावना पाऊस
ओढ गाई गीत ओले
खुळा मल्हार पाऊस
घननीळ-राधिकेचा
ओला शृंगार पाऊस
© अदिती जोशी
3/10/15
22:45