उरा अंतरातून बरसून गेला
झरा आत वाहे,तरीही सुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
कुणी हासते वा कुणी गीत गाते
कुणी प्रेमरंगात रंगून जाते
उभी एकटी दूर सार्याहुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
झरावे किती मेघ आतून सारे
फुलावे किती अंतरंगी शहारे
फिरो गार वारा किती आसमंती
तरी कोरडासा उरे जीव अंती
नव्याने नटो ही धरा मेघवेडी
नवी बावरी लाजुदे सांज थोडी
उभी पायथ्याशी नव्याने जुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
सख्या,एकदा जीव ऐसा झुरावा
सुटावे जिणे,श्वास माझा सरावा
उरो शेवटाला तुझी होवुनी मी
अधूरी सख्या रे तुझ्यावाचुनी मी
अदिती शरद जोशी
23/7/2014
4:22 am
No comments:
Post a Comment