
तू मेघ सावळासा घनदाट गर्द ओला
तू चांदवा निशेच्या केसात माळलेला
तू सूर बासरीचा दूरात गुंजणारा
पहिल्याच पावसाच्या तू स्वैर धुंद धारा
तू साद अंतरीची देहा सुखावणारी
तू शीत शांत छाया ह्या पेटत्या दुपारी
तू गंध रंगलेला दारातल्या कळीचा
तू नाद गुंजणार्या ह्या सोनसाखळीचा
रे मी समूर्त आज सजले तुझ्याचसठी
हळुवार लाघवी हे हासू तुझेच ओठी
हा गंध चंदनाचा पुरता तुझ्या हवाली
विरहार्त आसवेही सगळी तुझीच झाली
मी एकली धरेशी तू स्तब्ध धृव दूर
तुजवीण मी तुझ्यात विणते सशब्द सूर
जग हे जरी न माने असणे तुझे सख्या रे
देहात ह्या वसे जो, तो प्राणही तुझा रे
© अदिती जोशी
No comments:
Post a Comment