सांज बावरी,सांजेला कळते ना काही
शांत बाह्यतः,आतुन ही घोंगावत राही
सांज बोचरी,काळोखाची पूर्वकल्पना
वर केशरिया,अंतरात दडल्यात वेदना
सांज विरहिणी अडखळलेली मावळतीशी
नेत्र पश्चिमी,मन पूर्वेच्या क्षितिजापाशी
सांज हरीच्या बाहूंमधली राधा भोळी
मोहनरंगी रंगुन बनते रात्र सावळी...
अदिती जोशी
13/1/15
10:30 pm
अप्रतिम !
ReplyDeleteमन पूर्वेच्या क्षितिजावरती ! क्या बात है!
धन्यवाद!!
Delete